- “शिवांश – आपणही व्हावे त्यासम” – “वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेक गुणावर अभ्यासात्मक व्याख्यान व चर्चा” – इथून पुढे दुसऱ्या व चौथ्या रविवारी दुपारी ४ ते ५*
- शिवाजी महाराज म्हणजे एक विद्यापीठ आणि आम्ही त्याचे आजीवन विद्यार्थी आहोत असे ज्यांना वाटते अशा “इच्छुक” विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
- https://meet.google.com/pkw-oztp-cci
- मागील शनिवारचे व्याख्यान हे महाराजांच्या नियोजनकौशल्यावर झाले होते, पन्हाळा आणि शाहिस्तेखान या दोन्ही एकत्र आलेल्या संकटांना महाराजांनी कसे तोंड दिले, तसेच अफजलखान नामक संकटावर देखील त्यांच्या उत्तम नियोजनाने त्यांनी कशी मात केली यावर व्याख्यान झाले होते.*
यावरून आपल्या आयुष्यात देखील सगळीकडून गाठून आलं तर
– दोन संकटांपैकी कॊणत्या संकटाला आधी तोंड द्यायचं, – कधी एक पाऊल मागे घ्यायचं, – कोणकोणत्या गोष्टींचा किती बारकाईने विचार करायचा इत्यादी नियोजनकौशल्य आपणही शिकू शकतो.
*१४ एप्रिल २०२४ रोजी देखील “नियोजनकौशल्यावर” अधिक सखोल चिंतन होणार आहे.* तेव्हा आपले नियोजनकौशल्य (Planning Skills) अधिक उत्तम होण्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ही सुवर्णसंधी सिद्धयोग विधी महाविद्यालयातर्फे आपल्या सर्वांना मिळत आहे. त्याचा लाभ घ्यावा.
*आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला इच्छा असूनही महाराजांच्या चरित्राचे वाचन करता येत नाही. ज्यांना पोषक आहार खायला वेळ नसतो असे लोक ज्याप्रकारे व्हिटॅमिन कॅप्सूल घेतात त्याप्रकारे ही एक रेडिमेड “Knowledge & Motivation Capsule” आहे.