दिनांक ०८/०९/२०२३ रोजी समान नागरी कायदा या विषयावर वादविवाद स्पर्धा झाली. समान नागरी कायदा हा देशातील सर्वाधिक वादाच्या विषयांपैकी एक विषय आहे. सध्या विविध धर्मांसाठी वेगवेगळे कायदे लागू आहेत, पण समान नागरी कायदा लागू झाल्यास हे सर्व कायदे समान स्तरावर येतील. पण समान नागरी कायदा म्हणजे नेमका काय आणि त्याचे काय फायदे तोटे आहेत ते सिद्धयोग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वादविवाद स्पर्धेमध्ये उत्तम प्रकारे मांडले.