दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालय दायित्व उपक्रमाअंतर्गत आणि रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज सिद्धयोग विधी महाविद्यालय परिसर, योगिता दंत महाविद्यालय परिसर आणि रोटरी शाळेतील परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमांगी पोळ, सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे, तसेच रोटरी इंग्लिश मुख्याध्यापिका भूमिका पटेल त्याचप्रमाणे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.