सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड येथे दिनांक २१/१२/२०२३ रोजी स्पोर्ट डे चे आयोजन करण्यात आले होते. सिद्धयोग विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. प्रथम वर्षीय आणि तृतीय वर्षीय विद्यार्थ्यांमधील क्रिकेटचा सामना अतिथटीचा झाला. यामध्ये तृतीया वर्षीय विद्यार्थ्यांनी बाजी मारली. योगिता दंत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा जाधव मॅडम यांनी स्पर्धेच्या वेळी उपस्थिती दर्शवून स्पर्धेचे उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन देखील दिले. स्पर्धेच्या वेळी सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग तसेच इतर कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रीती बोंद्रे मॅडम आणि माजी प्राध्यापक अनिल सर यांनी स्पर्धेच्या वेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.