दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयांमध्ये श्री. राहुल कुलकर्णी सर यांनी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना “संशोधन प्रबंध व प्रबंध लेखन” या विषयावरती मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे मॅडम तसेच प्रा. रोहन सावंत, प्रा.अंजली हर्षे, तसेच प्रा. रश्मी भटसाळसकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहन सावंत यांनी केले व प्रा.अंजली हर्षे यांनी आभार मानले.