दिनांक ०४-०१-२०२४ रोजी सिद्धयोग विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुरुड ग्रामपंचायत दापोली येथे मोबाईल लोक अदालत मार्फत,पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी जिल्हा निवृत्त न्यायाधीश श्री जामखेडकर साहेब, वकील श्री बांद्रे आणि इतर कोर्ट कर्मचारी, मुरुड ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा मुरुड येथील विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद आणि सिद्धयोग विधी महाविद्यालय मधील प्राध्यापीका सौ. हर्षदा शिंदे आणि प्राध्यापक स्वप्निल खोपकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले. व त्याचे माननीय न्यायाधीश जामखेडकर साहेब यांनी विशेष कौतुक केले.