Skip to content Skip to sidebar Skip to footer

शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालय आणि योगिता दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  योगिता डेंटल सभागृहात महिला दिवस साजरा केला गेला. कार्यक्रमासाठी आमदार योगेश दादा कदम यांच्या सौभाग्यवती सौ. श्रेयाताई योगेशदादा कदम तसेच सांगलीतील मोठ्या उद्योजक आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या संस्थाचालक, श्रीम. मेघनाताई कोरे, आय.सी. एस कॉलेजच्या प्राचार्या, डॉ. अनिता अवटी मॅडम, संस्थेच्या सीईओ डॉ. पोळ मॅडम, दंत महाविद्यालयाच्या प्राचार्या, डॉ. वर्षा जाधव मॅडम आणि सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्रीती रतन बोंद्रे मॅडम तसेच सौ. नेहा पालांडे  यांची उपस्थिती होती.

स्त्री शक्तीला सलाम करत विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करत आणि प्रामुख्याने दोन्ही महाविद्यालयातील महिला सफाई कामगार वर्गाचा यथोचित सत्कार करून कार्यक्रम साजरा झाला. सिद्धयोगच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून कार्यक्रम अधिक रंगीत बनवला. तसेच श्री. विनय माळी आणि सौ. नमिता विनय माळी यांनी बहिणाबाईंची सुंदर गाणी सादर करून कार्यक्रमाला अर्थ प्राप्त करून दिला. रोटरी महाविद्यालयाचे संगीत शिक्षक, श्री. अभिषेक जोशी सर आणि त्यांच्या विद्यार्थांच्या सादरीकरणाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात “महाराष्ट्रातील कर्तबगार स्त्रिया” हे पुस्तक आणि एक सुंदरसा दीप भेट देऊन तिथे उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.
संदेश होता की एका हातात ज्ञानाचं प्रतीक – पुस्तक आणि दुसऱ्या हाती दीप घेऊन प्रत्येक स्त्रीने आज समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे, कारण ठरवलं तर संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याचं आणि स्वतःच्या आचरणातून समाजाला घडवण्याचं कार्य भारतात स्त्रीने समर्थपणे केलेलं आहे आणि तिचं स्थान हे भारतीय समाजाच्या बांधणीत नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे.
असा समर्पक संदेश देत सिद्धयोग महाविद्यालयाने स्त्री शक्तीला वंदन केले.