आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 21 जून 2023 रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते.सिद्धयोग महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. प्रीती बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांना योग साधने बद्दल उत्तम प्रकारे माहिती दिली. तसेच प्रोफेसर ऐश्वर्या मॅडम आणि अंजली मॅडम यांनी मुलांना योग प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. श्वेतलीना पाटील B.H.M.S.,C.G.O.,DYED, Diploma In Yoga & Naturopathy यांनी योग साधने बद्दल ऑनलाइन चर्चा सत्राच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना असणाऱ्या विविध आजारांवर योगविद्या किती महत्त्वाची आणि फायदेशीर आहे; याचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून या योग दिनाचे चे महत्व द्विगुणित केले.