१७ जुलै रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त १८ जुलै रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयात दुपारी १२ ते १.३० या वेळात वकिलांसाठी अत्यंत आवश्यक आणि महत्वाच्या विषयावर खेड येथील अधिवक्ता, श्री. अश्विन शाहू भोसले सर यांनी व्याख्यान दिले.
– उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायनिर्णयांचे तालुका आणि जिल्हा कोर्टातील वकिलांसाठी काय महत्त्व आहे
– याचे उदाहरणासहित आणि केस लॉ कसे शोधायचे याचे थेट प्रात्यक्षिक देत
– तसेच अशा केसेसचा अभ्यास कसा करायचा
यावर ज्ञानाने परिपूर्ण आणि व्यावहारिक पैलूंचा आढावा घेणारे प्रभावी सत्र ॲड.अश्विन भोसले वकिलांनी सिद्धयोग विधी महाविद्यालयातील भावी वकिलांसाठी घेतले.
रोजच्या अभ्यासक्रमव्यतिरिक्त व्यवहारिक प्रशिक्षण देण्यासाठी विविध प्रकल्प राबवत असून ज्ञान आणि कौशल्य याने परिपूर्ण असे वकिलीचे शिक्षण खेडमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि उत्कृष्ट वकील घडविण्यासाठी असलेली सिद्धयोग विधी महाविद्यालयाची कटिबद्धता पाहून भोसले वकिलांनी विद्यालयाच्या प्राचार्या, प्रीती बोंद्रे आणि संपूर्ण शिक्षक. आणि शिक्षकेतर वर्गाचे मनःपुर्वक अभिनंदन केले.