सिद्धयोग विधी महाविद्यालय मध्ये दिनांक २०/०२/२०२४ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या निमित्ताने महाविद्यालयामध्ये रांगोळी आणि स्केच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालामधील विद्यार्थ्यांनी नांदी,भारूड व तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर मनोगत आणि जीवनपटाविषयी व्हिडिओच्या मार्फत सादरीकरण केले. प्राध्यापक अंजली हर्षे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून प्रभो शिवाजी राजा या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








