सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये दिनांक १५/०४/२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती पेटवून करून झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. दिलीप चव्हाण सर यांनी केली तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्या. प्रीती बोन्द्रे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी एक शपथ घेतली कि आज पासून दररोज किमान एक तास तरी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनावरती भर देऊ. प्रा.रोहन सावंत यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.