Skip to content Skip to footer

इंडस्ट्रियल व्हिजिट – सिद्धयोग लॉ कॉलेजचा अनुभव

मी, प्रणाली भोसले – द्वितीय वर्ष एलएलबी विद्यार्थीनी, आमच्या महाविद्यालयाच्या उपक्रमांतर्गत झालेल्या इंडस्ट्रियल व्हिजिटचा अनुभव शेअर करत आहे.

आमचे सिद्धयोग लॉ कॉलेज हे केवळ कायद्याचे शिक्षण देणारे कॉलेज नाही, तर विद्यार्थ्यांना समाजाशी जोडणारे केंद्र आहे.
– ‘दायित्व’ उपक्रम – ज्याद्वारे आम्ही फ्री लीगल एड देतो.
– शाळा, महाविद्यालये आणि गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना, पालकांना, ग्रामस्थांना वेगवेगळ्या त्यांच्यासाठी महत्वाचे असलेल्या कायद्याबद्दल सांगतो,लीगल अवेअरनेस कार्यक्रम राबवतो.
– इंडस्ट्रियल व्हिजिट – ज्यातून इच्छुक विद्यार्थ्यांना पुढे इंटर्नशिपसाठी पाठवले जाते.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कायद्याचे प्रत्यक्ष जीवनाशी असलेले नाते समजते आणि समाजासाठी जबाबदार वकील म्हणून घडण्याची संधी मिळते.

प्रिव्ही ऑर्गॅनिक, महाड येथे भेट
आज सकाळी ९ वाजता आम्ही महाविद्यालयातून आम्ही नाश्ता करून निघालो. कॉलेजकडूनच कंपनीपर्यंत ये-जा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

महाड एम. आय. डी. सी. मधील प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड या अग्रगण्य उद्योगात पोहोचल्यानंतर, मोबाईल वापरण्यास परवानगी नसल्याने आम्ही ते बॅगमध्ये ठेवले. त्यानंतर सेफ्टी हेल्मेट घालून आम्ही वेगवेगळ्या युनिट्सची माहिती घेतली.

– कंपनीचे अधिकारी प्रशांत आंब्रे सर यांनी विद्यार्थ्यांना कंपनीतील नियम व नियमावली (Rules & Regulations) याबद्दल मार्गदर्शन केले.
– त्यानंतर एस. चव्हाण सर यांनी कंपनी बद्दल माहिती देत कंपनीचे वर्किंग मेकॅनिझम, सेफ्टी सिस्टीम आणि एकूणच कार्यप्रणाली याबद्दल सविस्तर माहिती दिली.
– पुढे श्री. गीते सर यांनी विद्यार्थ्यांना फॅक्टरी ऍक्ट आणि कंपनीत वापरले जाणारे महत्त्वाचे कायदे याबद्दल माहिती दिली.
– सिद्धयोग लॉ कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि सध्या कंपनीत अधिकारी असलेले श्री. पराग हेळेकर सर यांनी उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली आणि स्वतःचा अनुभव शेअर केला.

पराग हेळेकर हे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून सिद्धयोग लॉ कॉलेजमधून बाहेर पडलेल्या दुसऱ्या बॅचमधील माजी विद्यार्थी आहेत. आज ते कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, महाविद्यालयात शिकलेले कायदे प्रत्यक्ष उद्योगात कसे लागू होतात आणि वकिलांना उद्योगाशी जोडलेले कायदे समजून घेणे किती महत्त्वाचे आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली की, सिद्धयोग लॉ कॉलेजमधून बाहेर पडलेले विद्यार्थी उद्योगातही आपली छाप सोडू शकतात.

– शेवटी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीराम सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल एरियामध्ये वकिलांसाठी उपलब्ध करिअर संधी यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रश्नोत्तर झाली.

या भेटीत आम्ही अॅडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आणि टेक्निकल वर्क दोन्ही प्रत्यक्ष पाहिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमच्या 1st year student अंकिता शुक्ला हिने केले.
ही इंडस्ट्रियल व्हिजिट आमच्यासाठी केवळ शैक्षणिक अनुभव नव्हता, तर कायद्याचे प्रत्यक्ष जीवनाशी असलेले नाते समजून घेण्याची संधी होती. आमच्या सिद्धयोग लॉ कॉलेज द्वारे राबवले जाणारे विविध उपक्रम – दायित्व, लीगल अवेअरनेस, इंटर्नशिप – आणि आता ही इंडस्ट्रियल व्हिजिट, विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक आयुष्यासाठी अधिक सक्षम बनवतात. आम्हाला ही opportunity दिल्याबद्दल सिद्धयोग लॉ कॉलेज आणि प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड महाड चे आभारी आहोत.