राष्ट्रीय समुपदेशन स्पर्धेत प्रथम पारितोषिक तसेच ठाणे विधी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार करताना शिवसेना नेते. मा. पर्यावरणमंत्री मा.श्री.रामदासभाई कदम साहेब, खेड, दापोली, मंडणगड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री, योगेशदादा रामदासभाई कदम तसेच त्यांच्या सौभाग्यवती सौ.श्रेया योगेशदादा कदम. त्यांनी केलेल्या कौतुकामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि अजून प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रम प्रसंगी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे, प्रा.ॲड. दिलीप चव्हाण प्रा.हर्षदा कदम, तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.