समाजभान बाळगून समाजाप्रतीचं दायित्व जगणारे वकील घडणं आवश्यक आहे. खरा आनंद मिळतो तो निस्वार्थपणे देतानाच हे उमगणं देखील आवश्यक आहे म्हणून असे उपक्रम आपण राबवत असतो. एक वकील हा आधी चांगला माणूस घडला पाहिजे हे ध्येय समोर ठेऊन आपण “सिद्धयोग दायित्व” सुरू केलं आहे.
यात आमचे ॲड. दिलीप चव्हाण सर यांचं मोलाचं योगदान असतं. सिद्धयोग दायित्व हे त्यांच्या सहकार्यामुळे अधिकाधिक अर्थपूर्ण होत आहे.
तसंच श्री. विराज चिखले हे आपल्याकडे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत ज्यांच्या कलामृत या संस्थेमुळे आम्हाला परवा वाकवली आणि खोपी येथील आश्रम शाळेत फराळ आणि कपडे वाटपाची संधी मिळाली.
सिद्धयोगचे हे विद्यार्थी केवळ विद्यार्थी नाहीत हे आमचं कुटुंब आहे.