दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण होत असून त्या अनुषंगाने सन २०२४-२०२५ हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष “संविधान अमृत महोत्सव २०२४-२०२५ महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रा. प्रीती बोन्द्रे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन त्या संदर्भात माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.