सिद्धयोग विधी महाविद्यालय मध्ये दिनांक २७/०२/२०२४ रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी अभियोक्ता ॲड. श्रीमती. मृणाल जाडकर व ॲड. श्री. सतीश नाईक यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती प्रतिमेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. तसेच खेडमधील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी नांदी,भारूड व महाराष्ट्र गीत या महाराष्ट्राच्या पारंपारिक संस्कृतीचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक श्री. चव्हाण सर यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून मराठी अभिमान गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.